Chal Chal Chal Chal

चल-चल-चल-चल-चल-चल
चल-चल-चल-चल-चल-चल
चल-चल-चल-चल-चल-चल
चल-चल-चल-चल-चल-चल

चल-चल-चल-चल-चल-चल-चल-चल
चल-चल लवकर चल
चल-चल-चल-चल-चल-चल-चल-चल
चल थोडासा ढकल

बारीक हिम्मत, बारीकशी गम्मत
मोठ्ठी मज्जा, थोडीशी किमत
हातावरती कौतुकाचं सारण खाऊ चल
गालावरती हसण्याचं तोरण लावू चल

आपण राती स्वप्नांचे कंदील-बिंदील टांगू
असे भारी, हा भारी या छतावरती उजळेल सारी
हा सारी ही दुनिया भवती आमच्या सारी रे, धेरे ना

आसू आभाळाचे, हासू आपल्या इथे
रस्त्याच्या या आरश्यावरती छत हे हातांचे रे
आईच्या पायी छुमछुम छुमछुम पैंजण पाण्याचे
कळकट मळकट वाट कसली छान वाटते
वाटून खाल्ले सारे कसे गोड लागते
चटपट खटपट करून सारे मस्त भागते

आम्ही दिवसा श्वासांचे संगीत-बिंगीत लावू
असे धडधड, हा धडधड हा कानावरती
आमची सारी धडपड, हा धडपड
ही जगण्याची कलाकारी रे, धेरे ना

फाटका खिसा जरी, ऐपत आमची भारी
या आयुष्याचा परीक्षेत पास आम्ही रे
भरते रे मन हे थोड्यामध्ये, हाव नाही रे
कष्टांच्या या वाल्ह्यावारती आमची नाव रे
दुनियेला ही हेवा वाटेल अस्सा गाव रे
अंधाराची सोबत आम्हा दिवसा नाही रे

आम्ही जग हे कष्टाने बदलून-बिदलून टाकू
असे भारी, लय भारी, आम्ही आता करु अशी तय्यारी
ही गाडी आमची झाली चालू आता रे, धेरे ना



Credits
Writer(s): G. V. Prakash Kumar, Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link