Rubab Pahije

उष्टं पाष्टं बास म्हणतो एक एक श्वास
घास इज्ज्तीच्चा आपल्या हातात पाहिजे
होऊ दे तरास लांब कित्तीबी प्रवास
जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे

रडत, पडत, अडत जाऊ
तरीबी घेउनच्च राहू
दाखवून खाऊ यांना आता तर
पाहिजे रुबाब
हा रुबाब
हा रुबाब
हा रुबाब

उष्टं पाष्टं बास म्हणतो एक एक श्वास
घास इज्ज्तीच्चा आपल्या हातात पाहिजे
होऊ दे तरास लांब कित्तीबी प्रवास
जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे

हात आता पसरायचे नाही
मिळवायचं, आता मागायचं नाय
झुकवू दे सारी दुनिया किती
आपण बिलकुल झुक्कायचं नाय

या कोळसा जिंदगानीला
भाव सोन्याचा पाहिजे
रोज मरते भुकेसाठी
आता हीला चव पाहिजे

हा रुबाब
हा रुबाब
हा रुबाब
हा रुबाब

काळी कुट्ट रात माझ्या साचते मनात
तो चंद्र एकदा तरी हातात पाहिजे
होऊ दे तरास लांब कित्तीबी प्रवास
जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे

रडत, पडत, अडत जाऊ
तरीबी घेउनच्च राहू
दाखवून खाऊ त्यांना आता तर
पाहिजे रुबाब
हा रुबाब
हा रुबाब
हा रुबाब



Credits
Writer(s): G V Prakash Kumar, Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link