Drushta Lagnya Joge Sare (From "Majh Ghar Majha Sansar")

दृष्ट लागण्याजोगे सारे
गाल, बोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

दृष्ट लागण्याजोगे सारे
गाल, बोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

स्वप्नाहून सुंदर घरटे
मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे-जे हवे ते
होईल साकार येथे

स्वप्नाहून सुंदर घरटे
मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे-जे हवे ते
होईल साकार येथे

आनंदाची अन् तृप्तीची
शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

जुळले रे नाते अतूट
घडे जन्म-जन्मांची भेट
घेऊनिया प्रीतीची आण
एकरूप होतील प्राण

जुळले रे नाते अतूट
घडे जन्म-जन्मांची भेट
घेऊनिया प्रीतीची आण
एकरूप होतील प्राण

सहवासाचा सुगंध येथे
आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

दृष्ट लागण्याजोगे सारे
गाल, बोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे



Credits
Writer(s): Arun Paudwal, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link