Manuja Jaag Jara (From "Ashi Hi Banavabanavi")

जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विचारी मना तूच शोधून पाहे
जय जय रघुवीर समर्थ

ही दुनिया...
ही दुनिया...
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा

अळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे?
अरे, जमिनीवरती उगा शोधिसी आकाशातील तारे
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा, हो

फसू नको तू सावध वाग
रे मनुजा जाग, मनुजा जाग
ए, फसू नको तू सावध वाग
रे मनुजा जाग, मनुजा जाग

किती आले, किती गेले, भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले
किती आले, किती गेले, भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले

अरे, बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे
जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मळ व्हावे
ही दुनिया...
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा, हो

फसू नको तू सावध वाग
रे मनुजा जाग, मनुजा जाग
रे, फसू नको तू सावध वाग
रे मनुजा जाग, मनुजा जाग

थोडे द्यावे, थोडे घ्यावे, एकमेका प्रेम द्यावे
जीवनाला रंग यावे, अवघे आनंदाचे गंध उधळावे
थोडे द्यावे, थोडे घ्यावे, एकमेका प्रेम द्यावे
ओ, जीवनाला रंग यावे, अवघे आनंदाचे गंध उधळावे

चाकावाचून गाडी नाही, ताकावाचून लोणी
अरे, मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी?
ही दुनिया...
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा

अळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे?
अरे, जमिनीवरती उगा शोधिसी आकाशातील तारे
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा
ही दुनिया मायाजाल, मनुजा, जाग जरा, हो

फसू नको तू सावध वाग
रे मनुजा जाग, मनुजा जाग
ए, फसू नको तू सावध वाग
रे मनुजा जाग, मनुजा जाग, हा



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Arun Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link