Aika Aaj Kahani

ऐका आज कहाणी, डोळ्यात येई पाणी
माय-पित्यांच्या सेवेत सरली जीवन ज्योत विराणी
ऐका आज कहाणी, डोळ्यात येई पाणी

अंध आपल्या माय-पित्यांना यात्रेस न्यावे
वाटे श्रावना, खांद्यावरी
कावड त्यांची आनंद चाले घेऊनी

हो, ऐका आज कहाणी, डोळ्यात येई पाणी

माता पित्रे निषार्थ जाणी
पाणी बाळापाशी मागू लागली
वृक्षातळी ठेवून सांगे, "जल आणीतो मी भरुनी"

हो, ऐका आज कहाणी, डोळ्यात येई पाणी

वाके तळाशी आवाज झाला
येऊनिया बाण वेधी उराला
सांगे तरी नेऊनी त्यांहा माता-पित्यांना पाणी

हो, ऐका आज कहाणी, डोळ्यात येई पाणी
माय-पित्यांच्या सेवेत सरली जीवन ज्योत विराणी
ऐका आज कहाणी, डोळ्यात येई पाणी



Credits
Writer(s): Shantaram Nandgaonkar, Ashok Govind Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link