Bat Paurnima Aali Ga (From "Jawayachi Jat")

वट पौर्णिमा आली गं
ओटी अंब्यानं भरूया
सण वरसाचा आज
पूजा वडाची करूया

(वट पौर्णिमा आली गं)
(ओटी अंब्यानं भरूया)
(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

पतिव्रतेचा वसा गं
सुवासिनींचं हे वान
नारी जातीनं करावा
भोळ्या भरताराचा मान

(पतिव्रतेचा वसा गं)
(सुवासिनींचं हे वान)
(नारी जातीनं करावा)
(भोळ्या भरताराचा मान)

हात जोडून देवाच्या
प्रदक्षिणेला फिरुया
(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

सात जन्माचा सोबती
धनी, माझा पतीदेव
माझ्या संसार मंदिरी
लाख मोलाची ही ठेव

(सात जन्माचा सोबती)
(धनी, माझा पतीदेव)
(माझ्या संसार मंदिरी)
(लाख मोलाची ही ठेव)

कायवाचा मनामदी
त्याच्या नावाला स्मरूया
(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

सावित्रीच्या कुंकवाला
सत्यवानाचा गं रंग
औक्ष उदंड मिळं गं
धागा फिरे भाग्यासंग

(सावित्रीच्या कुंकवाला)
(सत्यवानाचा गं रंग)
(औक्ष उदंड मिळं गं)
(धागा फिरे भाग्यासंग)

भावसार्थक जन्मात, ओ
भावसार्थक जन्मात
आशा मनात भरूया
(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

(वट पौर्णिमा आली गं)
(ओटी अंब्यानं भरूया)
(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)

(सण वरसाचा आज)
(पूजा वडाची करूया)



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link