Majhi Priya Hasavo (From "Jawayachi Jat")

स्वप्नात चांदण्याच्या...
स्वप्नात चांदण्याच्या जणू पौर्णिमा दिसावी

होऊन आज राधा माझी प्रिया हसावी
माझी प्रिया हसावी
होऊन आज राधा माझी प्रिया हसावी
माझी प्रिया हसावी

कुजबुजली ही पानफुले गं
कुजबुजली ही पानफुले गं
गुपित राधिके मला कळे गं
गुपित राधिके मला कळे गं

अवचित धागा कसा जुळे गं?
अवचित धागा कसा जुळे?
ही रेशीमगाठ बसावी

माझी प्रिया हसावी, माझी प्रिया हसावी
होऊन आज राधा...
होऊन आज राधा माझी प्रिया हसावी
माझी प्रिया हसावी

मी मनहरिणी, मी वनराणी
मी मनहरिणी, मी वनराणी
भ्रमर छेडितो गुंजत गाणी
भ्रमर छेडितो गुंजत गाणी

माठ थरथरे, निथळे पाणी
माठ थरथरे, निथळे पाणी
माझी लाज रुसावी

माझी प्रिया हसावी, माझी प्रिया हसावी
प्रतिमा शकुंतलेची, प्रतिमा शकुंतलेची
माझी प्रिया हसावी, माझी प्रिया हसावी

शृंगाराच्या निबिड वनाचे
जपतप सारे खेळ मनाचे
शृंगाराच्या निबिड वनाचे
जपतप सारे खेळ मनाचे

डोळे मिटुनी ध्यान कुणाचे
डोळे मिटुनी ध्यान कुणाचे
प्रीती कशी फसावी

माझी प्रिया हसावी, माझी प्रिया हसावी
होऊन मेनका ही, होऊन मेनका ही
माझी प्रिया हसावी, माझी प्रिया हसावी
होऊन आज राधा माझी प्रिया हसावी
माझी प्रिया हसावी



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link