Tuiya Vina Ha Shravan Vairi

तुझ्याविना हा श्रावण वैरी
तुझ्याविना हा श्रावण वैरी
पाझरती धारा, जिवलगा
परतून ये माघारा, परतून ये माघारा

मुक्या जीवाला छळूनी जातो
मुक्या जीवाला छळूनी जातो
भिरभिरता वारा, जिवलगा
परतून ये माघारा, परतून ये माघारा

झाड मुके हे बहरून येता
झाड मुके हे बहरून येता
फुल गळावे फांदीवरले
सुन्या-सुन्या या कातरवेळी
मन माझे रे गहिवरलेले

सुकून गेला वेणीमधला
सुकून गेला वेणीमधला
घमघमता गजरा, जिवलगा
परतून ये माघारा, परतून ये माघारा

थेंब थांबले डोळ्यामधले
थेंब थांबले डोळ्यामधले
डोळे थांबून वाट पाहती
वाटेवरती दिवे पेटले
जळूनी गेल्या कापूर वाती

दुखरे काळीज कुणास दावू?
दुखरे काळीज कुणास दावू?
जिवा नसे थारा, जिवलगा
परतून ये माघारा, परतून ये माघारा

तुझ्याविना हा श्रावण वैरी
तुझ्याविना हा श्रावण वैरी
पाझरती धारा, जिवलगा
परतून ये माघारा, परतून ये माघारा



Credits
Writer(s): Anil Mohile, Ashok Bagve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link