Om Gajanana

श्रीकारातून वेचू श्रद्धा, प्रेम आणिक ज्ञाना
शिका मुलांनो श्री गणेशा वंदूनी गजवदना
"ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना"
("ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना")

श्रीकारातून वेचू श्रद्धा, प्रेम आणिक ज्ञाना
शिका मुलांनो श्री गणेशा वंदूनी गजवदना
"ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना"
("ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना")

माय-पित्यांना मान द्या, आज्ञाधारक व्हा सदा
विनम्रभावे वागा ठेवा, बुद्धी जागृत सर्वदा
माय-पित्यांना मान द्या, आज्ञाधारक व्हा सदा
विनम्रभावे वागा ठेवा, बुद्धी जागृत सर्वदा

विश्वरूप मातेला घाली गणेश प्रदक्षिणा
"ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना"
("ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना")

जे मंगल शुभकारी, पवित्र त्याला वंदा
करू नका कोणाची थट्टा अथवा निंदा
जे मंगल शुभकारी, पवित्र त्याला वंदा
करू नका कोणाची थट्टा अथवा निंदा

थट्टेपायी चंद्र शापिला ठावे सर्वजनांना
"ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना"
("ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना")

ज्योतिपरी नित्य तेवत राहुनी
दुसऱ्याला निज प्रकाश देऊनी
दीन जणांची दुःखे हरुनी

चंदन होऊन प्रसन्नतेचा सुगंध द्या सर्वाला
"ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना"
("ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना")

श्रीकारातून वेचू श्रद्धा, प्रेम आणिक ज्ञाना
शिका मुलांनो श्री गणेशा वंदूनी गजवदना
"ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना"
("ॐ गजानना" बोला, "ॐ गजानना")



Credits
Writer(s): Santaram Nandgaonkar, Shekhar Sen
Lyrics powered by www.musixmatch.com

Link