Savli Murti Konachi

सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची
शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची
(सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची)
(शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची)

शक्ती ही न्यारी, गाथा ही न्यारी तुळजाभवानीची
भक्ताला तारी कृपा ही न्यारी भवानीमातेची
(सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची)
(शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची)

धरतीवरी हे अंबिके महिषासुराला मारिले तू
(महिषासुराला मारिले तू)
देवाधिका ऋषीमुनी ते भक्तजनाला तारिले तू
(भक्तजनाला तारिले तू)

तारिले तू, तारिले तू, तुळजाभवानी तारिले तू
(अंबाबाईचा उदो-उदो)
सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची
शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची

खडकावरी अंबिके तुझे दिसे आम्हाला पाऊल ठसे
(दिसे आम्हाला पाऊल ठसे)
तुकाई तू गं, तुळजाई तू गं अनेक रूपे आम्हाला दिसे
(अनेक रूपे आम्हाला दिसे)

पाऊल तुझे, पाऊल तुझे, घाटशिळेवर पाऊल तुझे
(अंबाबाईचा उदो-उदो)
सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची
शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची

पावन होई भाविक सारे ब्राम्हदेवाच्या कल्होळामधी
(ब्राम्हदेवाच्या कल्होळामधी)
तीर्थ हे तुझं गौमुखी मिळे, भक्त हे करती पूजनविधी
(भक्त हे करती पूजनविधी)

पूजनविधी, पूजनविधी, अंबिके तुझी ही पूजनविधी
(अंबाबाईचा उदो-उदो)

सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची
शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची
(सावळी मूर्ती कोणाची? तुळजाभवाणीची)
(शिवबाची तलवार कोणाची? भवानी मातेची)

शक्ती ही न्यारी, गाथा ही न्यारी आई तुळजाईची
भक्ताला तारी कृपा ही न्यारी भवानीमातेची



Credits
Writer(s): Sagar Pawar, Nitin Morajkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link