Chandrabhage Teeri

चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
वारकरी गाती गोड ते अभंग
वारकरी गाती गोड ते अभंग

चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग

"विठ्ठल" नामाचा उडाला गजर
दिंड्या-पताकाने शोभे परिसर
"विठ्ठल" नामाचा उडाला गजर
दिंड्या-पताकाने शोभे परिसर

आसमंत डोले घुमता मृदुंग
आसमंत डोले घुमता मृदुंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग

करताना सेवा आई-वडिलाची
पुंडलिक गायी गाथा विठ्ठलाची
करताना सेवा आई-वडिलाची
पुंडलिक गायी गाथा विठ्ठलाची

पाहुनी ती भक्ती विठू होई दंग
पाहुनी ती भक्ती विठू होई दंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग

तुका, चोखा, नामा, संत जनाबाई
माऊली तयांची विठू रखुमाई
तुका, चोखा, नामा, संत जनाबाई
माऊली तयांची विठू रखुमाई

एकरूप होई असा संत संघ
एकरूप होई असा संत संघ
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग

विटेवरी आहे पंढरीचा नाथ
अवर्णीय शोभा पंढरपुरात
विटेवरी आहे पंढरीचा नाथ
अवर्णीय शोभा पंढरपुरात

लागे भाविकांची दर्शनास रांग
लागे भाविकांची दर्शनास रांग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग
चंद्रभागे तीरी उभा पांडुरंग



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link