Sod Re Sod Hari

सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)
सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)
गाऱ्हाणी वरचे वरी (नारी गवळ्यांच्या करी)
गाऱ्हाणी वरचे वरी (नारी गवळ्यांच्या करी)
ए, सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)

जाता गवळणी बाजाराला
जाता गवळणी बाजाराला (ल ल ल ला)
पाठी जाऊनी तू गोपाला
पाठी जाऊनी तू गोपाला (ल ल ल ला)

घेशी पिचकारी संग, भरुनी लाल रंग
घेशी पिचकारी संग, भरुनी लाल रंग
उडविशी अंगावरी (रीत ही नाही बरी)
सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)

खळा मारुन काढी खोडी
घडा भरल्या दुधांचा फोडी (ला ल ल ला)
खळा मारुन काढी खोडी
घडा भरल्या दुधांचा फोडी (ला ल ल ला)

ए, लाज कशी ना थोडी झोंबुनी पदरा ओढी
अरे, लाज कशी ना थोडी झोंबुनी पदरा ओढी
अडवुनी वाटेवरी (रीत ही नाही बरी)
अरे, सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)

बसता गवळणी आंघोळीला
बसता गवळणी आंघोळीला (ल ल ल ला)
संधी साधूनी नंदलाला
संधी साधूनी नंदलाला (ल ल ल ला)

चोरून लुगडी त्यांची यमुनेच्या काठावरची
अरे, चोरून लुगडी त्यांची यमुनेच्या काठावरची
ठेवी कळंबावरी (रीत ही नाही बरी)
ए, सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)

घेऊनी गोपाळांचा मेळा
अडवी गवळणी वेळो-वेळा (ल ल ल ला)
घेऊनी गोपाळांचा मेळा
अडवी गवळणी वेळो-वेळा (ल ल ल ला)

नाचाया लावी सकला भुलवुनी भोळ्या अबला
ए, नाचाया लावी सकला भुलवुनी भोळ्या अबला
मुरलीने धुंद करी (रीत ही नाही बरी)
सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)

गाऱ्हाणी वरचे वरी (नारी गवळ्यांच्या करी)
सोड रे, सोड हरी (रीत ही नाही बरी)
(रीत ही नाही बरी, रीत ही नाही बरी)
(रीत ही नाही बरी, रीत ही नाही बरी)
(रीत ही नाही बरी)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Ramakant Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link