Hich Amuchi Praarthana

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम् वागणे

(हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे)
(माणसाने माणसाशी माणसासम् वागणे)
(हीच अमुची प्रार्थना...)

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
(धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे)
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे

(अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे)
(माणसाने माणसाशी माणसासम् वागणे)
(हीच अमुची प्रार्थना...)

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री

तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम् वागणे
हीच अमुची प्रार्थना...

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाऊले चालो पुढे जे थांबले, ते संपले

(घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे)
(माणसाने माणसाशी माणसासम् वागणे)
(हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे)
(माणसाने माणसाशी माणसासम् वागणे)
(हीच अमुची प्रार्थना...)



Credits
Writer(s): Sameer Samant, Kaushal Inamdar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link