Kaalokhaacha Rang Konata

लखलखणाऱ्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती
एक ही तारा इथे दिसे ना का आकाशी वरती?
लखलखणाऱ्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती
एक ही तारा इथे दिसे ना का आकाशी वरती?

वाट हरवता वाट सरूला दिशा कशी समजावी
ध्रुव बाळाच्या अढळ पदाची गोष्ट कुणा उमजावी
सारे काही ढळलेले, दळमळलेले, गोंधळलेले
काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले

शेवट कुठला? मध्य कुठे? प्रारंभ कोणता?
काळोखाचा रंग कोणता?
ह्या काळोखाचा रंग कोणता?

चहूकडे कोलाहल केवळ, गडबड, गोंधळ सारं
कुणीही कुणाशी बोले ना, कल्लोळ तरी घुमणार
शांत रात्र, सळसळता वारा, चंद्र नभी गडलेला
रात्रीला निद्रान अशाचा रोग इथे जडलेला

सारी नगरी सजलेली, गजबजलेली, बजबजलेली
यंत्रामागून यंत्र धावती हृदये सारी निजलेली

साद कोणाची, वाद कसा, संवाद कोणता?
ह्या निशब्दाचा नाद कोणता?
ह्या काळोखाचा रंग कोणता?



Credits
Writer(s): Sameer Samant, Kaushal Inamdar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link