Tujhya Manat Kuni Tari Lapala Ga

तुझ्या मनात...
तुझ्या मनात...
तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं

तुझ्या मनात...
किती जरी आजवर जपलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात...

कधी न दिला डोळ्याला डोळा
स्वभाव अगदी साधा-भोळा
कसा सुचावा भलता चाळा
कसा सुचावा भलता चाळा

परि दैव खुदूखुदू हसलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं
तुझ्या मनात...

कसा धरावा सखे भरवसा?
कसा धरावा सखे भरवसा?
पळेल कुठवर बाई गं ससा?
प्रीत पारधी येईल सहसा

कसं अचुक...
कसं अचुक सावज फसलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं
तुझ्या मनात...

मदनदूत पिटतीन डांगोरा, आ
मदनदूत पिटतीन डांगोरा
मनोगते ही सांगती चोरा
मनमोरा नाचसी माजोरा
मनमोरा नाचसी माजोरा

कुणी नव्हेच...
कुणी नव्हेच बाई आपलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात...

तेच नाव ओठांवर यावे
तेच नाव ओठांवर यावे
तेच बोल कानात घुमावे
तेच बोल गं
तेच बोल कानात घुमावे

तेच रूप नयनांत भरावे
तेच रूप नयनांत भरावे

ते गुपित...
ते गुपित आम्हांला कळलं गं
तुझ्या मनात...
तुझ्या मनात कुणीतरी लपलं, लपलं, लपलं गं
तुझ्या मनात...

किती जरी आजवर जपलं गं
तुझ्या मनात...
किती जरी आजवर जपलं गं
तुझ्या मनात...



Credits
Writer(s): Raja Badhe, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link