Kiti Bolato Apan

किती बोलतो आपण दोघे...
किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
किती बोलतो...

अशी-कशी ही ओळख जातील, अनोळखीपण संपत नाही
अशी-कशी ही ओळख जातील, अनोळखीपण संपत नाही, संपत नाही

तुला गुणगुणत असतानाही...
तुला गुणगुणत असतानाही, तुला ऐकणे राहून जाते
तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
किती बोलतो...

आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणे
हो, आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणे
परकी वळणे, परकी वळणे

कधी चालणे राहून जाते...
कधी चालणे राहून जाते, कधी थांबणे राहून जाते
किती बोलतो...

शब्दांमधूनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो
शब्दांमधूनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो

हाताइतके अंतर असुनी...
हाताइतके अंतर असुनी हाक मारणे राहून जाते
किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
किती बोलतो...

Credits
Writer(s): Avadhoot Gupte, Vaibhav Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link