Asehi Ekada Vhave

तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे
तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे
तुझ्याशी भेटही व्हावी असेही एकदा व्हावे

कधी पाऊस झरतांना, मनाला चिंब करतांना
तुझी सर ओळखू यावी असेही एकदा व्हावे
तुला स्पर्शून आलेली सुगंधी रात्र मेहंदीची
मला स्पर्शून रंगावी असेही एकदा व्हावे

जवळ येशील तू तेव्हा विझावे चंद्र-ताऱ्यांनी
जवळ येशील तू तेव्हा, तेव्हा विझावे चंद्र-ताऱ्यांनी
नभाने वेळ पाळावी असेही एकदा व्हावे

तुझ्या-माझ्यातली मैफल...
तुझ्या-माझ्यातली मैफल, तुझ्या-माझ्यात हरवावी
कोणी ना भैर विकावी असेही एकदा व्हावे



Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Adwait Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link