Hasle Fasle

हसले-फसले, हरवून मला मी बसले
हसले-फसले, हरवून मला मी बसले
...हरवून मला मी बसले

कळी मी अबोल होते, वारा लबाड आला
कळी मी अबोल होते, वारा लबाड आला
मी अंग चोरीले गं, मी अंग चोरीले गं
हळुवार स्पर्श झाला, हळुवार स्पर्श झाला

क्षण ते दवात भिजले
हसले-फसले, हरवून मला मी बसले
...हरवून मला मी बसले

देहातुनी फुलावे गीत गुज एक ओले
देहातुनी फुलावे गीत गुज एक ओले
कुजबुज पाकळ्यांची गंधास रंग बोले

सारे मनात ठसले
हसले-फसले, हरवून मला मी बसले
...हरवून मला मी बसले

वेलीवरी धुक्याचा फुटता नवा शहारा
वेलीवरी धुक्याचा फुटता नवा शहारा
स्वप्नात जागले मी छेडीत चंद्रतारा

स्वर ते अबोध कसले?
हसले-फसले, हरवून मला मी बसले
...हरवून मला मी बसले

ओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे
ओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे
मजला मिळून सारे, काही न आज माझे
मजला मिळून सारे, काही न आज माझे

म्हणुनी उगाच रुसले
हसले-फसले, हरवून मला मी बसले
हसले-फसले, हरवून मला मी बसले

...हरवून मला मी बसले
...हरवून मला मी बसले



Credits
Writer(s): Jagdish Kheboodkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link