Hey Chandne Fulani

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
ओल्या दंवात न्हाली

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
ओल्या दंवात न्हाली

तारे निळ्या नभात हे गुज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस?
तारे निळ्या नभात हे गुज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस?

ओठातल्या स्वराला...
ओठातल्या स्वराला का जाग आज आली?
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
ओल्या दंवात न्हाली

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
ओल्या दंवात न्हाली

तो स्पर्श चंदनाचा कि गंध यौवनाचा?
उधळीत रंग आला स्वप्नातल्या स्वरांचा
तो स्पर्श चंदनाचा कि गंध यौवनाचा?
उधळीत रंग आला स्वप्नातल्या स्वरांचा

ती रात्र धुंद होती...
ती रात्र धुंद होती स्वप्नांत दंगलेली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
ओल्या दंवात न्हाली

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
ओल्या दंवात न्हाली



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Madhusudan Kalelkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link