Ek Ek Virate Tara

प्रेमझरा, एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा
उभा देवराया क्षितिजावरती
एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा
उभा देवराया क्षितिजावरती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती

पालवीत किलबिल होई, दिगंतरा पक्षी जाई
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती

किरण सोनियाचे माझ्या अंगणात आले
मंद-मंद वाहे वारा, तुळस त्यात डोले

रंगवल्लिकेच्या रेखा, कुणी रेखिताती देखा?
सुवासिनी जलभरणाते जाती
सुवासिनी जलभरणाते जाती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती

फुटे गाउलीला पान्हा
तिला तिचा बिलगे तान्हा
माय माऊलीची ममता मोठी

माय माऊलीची ममता मोठी
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती

एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा
उभा देवराया क्षितिजावरती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती
सरली राती, सरली राती, सरली राती



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link