Vahatya Vari Yacha

वाहत्या वारीयचा मंदावला सूर रे
वाहत्या वारीयचा मंदावला सूर रे
माझिया तान्ह्या बाळा जो-जो रे
चिमण्या राजसा, जो-जो रे

निजल्या राघू-मैना, निजले चिऊ-काऊ
नको रे माझ्या राजा, खेळाचा छंद घेऊ
पेंग ये आभाळाला, पेंगुळला सांड रे

झोपल्या झाडे-वेली, सावल्या झोपी गेल्या
बागेत फुलांचाही पाकळ्या उमटू आल्या
झोपल्या गाऊल्या रे, झोपली वासरे

देवकी राहे दुरी, दाटला उरी पान्हा
यशोदे घरी वाढे गोकुळी तीचा तान्हा
पालकी जोजविते ब्रम्हरुप गोजिरे

वाहत्या वारीयचा मंदावला सूर रे
Uhmm, जो-जो रे, uhmm, जो-जो रे



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link