Aala Fulpankhi Shravan

आला फुलपंखी श्रावण, आला फुलपंखी श्रावण
आला फुलपंखी श्रावण, आला फुलपंखी श्रावण
एक पंख पावसाचा, एकी उन्हा गोंदउन
आला फुलपंखी श्रावण, आला फुलपंखी श्रावण
एक पंख पावसाचा, एकी उन्हा गोंदउन
आला फुलपंखी श्रावण

रानोमाळ मांडलेली रंगफुलांची आरास
रानोमाळ मांडलेली रंगफुलांची आरास
इवल्याशा निर्झरात आले लावण्य भरास
देई वेडा इंद्र मग नभ...
देई वेडा इंद्र मग नभ, नभ धरास न्हाऊन
एक पंख पावसाचा, एकी उन्हा गोंदउन
आला फुलपंखी श्रावण

एका सरीची सतार...
एका सरीची सतार, छेडी कोमल मल्हार
एका सरीची सतार, छेडी कोमल मल्हार
डंख उन्हाचा कोवळा जणू लाविला गंधार

राग श्रावणी रंगले...
राग श्रावणी रंगले ओल्या पाना-पानातून
एक पंख पावसाचा, एकी उन्हा गोंदउन
आला फुलपंखी श्रावण

मेघ सावळा-सावळा बाई झाला गं माधव
मेघ सावळा-सावळा बाई झाला गं माधव
धरणी राधिका होऊन जपे तयाचे लाघव

तिच्या अंगोपांगी राती...
तिच्या अंगोपांगी राती धरे श्रावणी चांदण
एक पंख पावसाचा, एकी उन्हा गोंदउन
आला फुलपंखी श्रावण, आला फुलपंखी श्रावण

आला फुलपंखी श्रावण, आला फुलपंखी श्रावण
एक पंख पावसाचा, एकी उन्हा गोंदउन
आला फुलपंखी श्रावण



Credits
Writer(s): Vivek Tendulkar, Aarti Gosavi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link