Prem Prem - From "Prem"

(प्रेम-प्रेम, प्रेम-प्रेम)
(प्रेम-प्रेम, प्रेम-प्रेम)
(प्रेम-प्रेम, प्रेम-प्रेम)

मनी फुलांची बाग उमलते
इथे सुखाशी स्वप्न बोलते (प्रेम-प्रेम, प्रेम-प्रेम)
स्पर्शातूनही कळती इशारे (प्रेम-प्रेम, प्रेम-प्रेम)
शब्दही बनती मुके बिचारे (प्रेम-प्रेम, प्रेम-प्रेम)

कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून
कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून
नभातुन कधी झरझर झरते

(प्रेम-प्रेम) हृदयाची भाषा
(प्रेम-प्रेम) जगण्याची आशा
(प्रेम-प्रेम) काळजाचे स्पंदन
(प्रेम-प्रेम) भावनांचे दर्पण

अंधाराच्या कुशीत शिरुनी जशी तेवते ज्योत
जगण्याला या आनंदाने तशी फुलविते प्रीत
दूर असूनही जवळ भासतो नभातला तो चांद
विरहामध्ये प्रेम बनविते मनास आतुर धुंद

कधी बावरते, कधी मोहरते
कधी बावरते, कधी मोहरते
कधी हुरहूरते, भिरभिर भिरते

(प्रेम-प्रेम) श्वासांची गुंफन
(प्रेम-प्रेम) ओठांचे गुंजन
(प्रेम-प्रेम) कधी मुग्ध भावना
(प्रेम-प्रेम) कधी आर्त प्रार्थना

अनोळखी का जग भासे प्रेमात या भिजता चिंब
मी ओळखण्या स्वतःस बघतो पाण्यातील प्रतिबिंब
जागेपणही मनात झुलती स्वप्नांचे हिंदोळे
वाटेवरती उगाच झुरती कुणासाठी हे डोळे

कधी हुंकारत, कधी झंकारत
कधी हुंकारत, कधी झंकारत
लाटांवरती सळसळ सळते

(प्रेम-प्रेम) फुलांच्या वाटा
(प्रेम-प्रेम) कधी सलता काटा
(प्रेम-प्रेम) कधी शीतल तारा
(प्रेम-प्रेम) कधी तप्त निखारा

(प्रेम-प्रेम) श्वासांची गुंफन
(प्रेम-प्रेम) ओठांचे गुंजन
(प्रेम-प्रेम) जगण्याची आशा
(प्रेम-प्रेम)



Credits
Writer(s): Shashank Powar, Yuvraj Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link