Tukaramachi Aarti

आरती तुकारामा

स्वामी सद्गुरू धामा
सच्चीदानंद मूर्ती
पाय दाखवी आम्हा, दाखवी आम्हा

(आरती आरती तुकारामा)

राघवे सागरात, पाषाण तारीले
तैसे हे तुकोबाचे
अभंग उदकी रक्षीले, उदकी रक्षीले

(आरती तुकारामा)

तुकिता तूळणेसे
ब्रह्म तुकासि आले
म्हणुनी रामेश्वरे
चरणी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले

(आरती तुकारामा)
(आरती तुकारामा)
(आरती तुकारामा)



Credits
Writer(s): Sanjeevani Bhelande, Anish Sharma
Lyrics powered by www.musixmatch.com

Link