Reshmi

नाव घेता तुझे अंतरी वादळे
वादळांच्यासवे तू मला भेटते
शोध घेता तुझा मी नभाचा पुढे
चांदण्यांच्यासवे तू मला भेटते

रेशमी, श्वास हा रेशमी
रेशमी, भास हा रेशमी
रेशमी, श्वास हा रेशमी
रेशमी, भास हा रेशमी

तू जरा हासता, वाढती स्पंदने
तू जरा लाजता, वेड लागे जीवा
तू जरा हासता, वाढती स्पंदने
तू जरा लाजता, वेड लागे जीवा

तो इशारा नसे, तो किनारा मला
सागराचासवे तू मला भेटते

रेशमी, लाट ही रेशमी
रेशमी, वाट ही रेशमी
रेशमी, लाट ही रेशमी
रेशमी, वाट ही रेशमी

हो, श्रावणाच्या सरी ही तुझी पैंजणे
फूल चाफा जणू ही तुझी लोचने
श्रावणाच्या सरी ही तुझी पैंजणे
फूल चाफा जणू ही तुझी लोचने

भासते तू मला सावली सारखी
चाहुलींच्यासवे तू मला भेटते

रेशमी, गंध हा रेशमी
रेशमी, बंध हा रेशमी
रेशमी, गंध हा रेशमी
रेशमी, बंध हा रेशमी



Credits
Writer(s): Prashant Jamdar, Niranjan Pedgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link