Sabhovati Tujhe Hasu

सभोवती तुझे हसू
जिथे-तिथे दिसे मला
हवा-हवासा चेहरा हा
खुणावतो पुन्हा मला

वेड नवे, ओढ नवी
लागे जणू मला-तुला
नकळत का जुळतो असा
बंध नवा मनातला?

उमले (उमले) गाली (गाली) तुझ्या टपोर चांदणे
भुललो मी ही तुझे बघून लाजने

क्षण वेडे-पिसे शहरावे कसे माझे-तुझे?
मन वेडे-पिसे सावरावे कसे माझे-तुझे?
क्षण वेडे-पिसे शहरावे कसे माझे-तुझे?
मन वेडे-पिसे सावरावे कसे माझे-तुझे?

वेड नवे, ओढ नवी
लागे जणू मला-तुला
नकळत का जुळतो असा
बंध नवा मनातला?

छेडू (छेडू) आता (आता) प्रेमातल्या सुरावती
चालू (चालू) वाटा (वाटा) तुला घेऊन सोबती

पाहताना तुला जग सारे जाते विसरुन मी
जाते नजरेच्या एका इशाऱ्याने हरवून मी
पाहताना तुला जग सारे जाते विसरुन मी
जातो नजरेच्या एका इशाऱ्याने हरवून मी

वेड नवे, ओढ नवी
लागे जणू मला-तुला
नकळत का जुळतो असा
बंध नवा मनातला?



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Ajay Kishor Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link