Sabhovati Tujhe Hasu (Solo)

सभोवती तुझे हसू
जिथे-तिथे दिसे मला
हवाहवासा चेहरा हा
खुणावतो पुन्हा मला

वेड नवे, ओढ नवी
लागे जणू मला-तुला
नकळत का जुळतो असा
बंध नवा मनातला?

उमली गाली तुझ्या टपोर चांदणे
भुलले मी ही तुझे बघून हासणे

क्षण वेडेपिसे शहारावे कसे माझे-तुझे?
मन वेडेपिसे सावरावे कसे माझे-तुझे?
क्षण वेडेपिसे शहारावे कसे माझे-तुझे?
मन वेडेपिसे सावरावे कसे माझे-तुझे?

वेड नवे, ओढ नवी
लागे जणू मला-तुला
नकळत का जुळतो असा
बंध नवा मनातला?

छेडू आता प्रेमातल्या सुरावती
आ, चालू वाटा तुला घेऊन सोबती

पाहताना तुला जग सारे जाते विसरुन मी
जाते नजरेच्या एका इशाऱ्याने हरवून मी
पाहताना तुला जग सारे जाते विसरुन मी
जाते नजरेच्या एका इशाऱ्याने हरवून मी



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Ajay Kishor Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link