Saaj Sonyacha

साज सोन्याचा, हार मोत्यांचा, गंध नात्यांचा
मन कोवळी चाहूल होई
बंध न्यारा हा कळेना तुजला, उभी बाजूला
मी सावरून स्वप्ने सारी

होऊ दे जीव जरा कावरा-बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा, अरे, एकदा

साज सोन्याचा, हार मोत्यांचा, गंध नात्यांचा
मन कोवळी चाहूल होई

जोडला कुणी दुवा, रेशमी धागा नवा
हा जीवनाचा हात हाती बिलगला
वाट ही वेगळी देऊनी जाते मनाला
छंद वेडा ना तुला कळला

होऊ दे जीव जरा कावरा-बावरा
गुंतुनी बघ जरा तू एकदा, अरे, एकदा

साज सोन्याचा, हार मोत्यांचा, गंध नात्यांचा
मन कोवळी चाहूल होई
बंध न्यारा हा कळेना तुजला, उभी बाजूला
मी सावरून स्वप्ने सारी



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Mahesh S Ogale, Chinar Kharkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link