O Saathi Re - Female Version

नकळत निसटून जाते हातून जे काही
मिळते का रे कुणा?

उसवून धागे सारे विरले जे काही
सलते का रे तुला?
जरी प्रवास हा तुझा उन्हातला
असेल सावली तुझी मी साथीला

चाहूल ही आहे नवी
तू साद दे, ओ साथी रे
स्वप्नातल्या ह्या प्रेमास रे
तू नाव दे, ओ साथी रे

अंधारल्या दिशा जरी, ताऱ्यातुनी दिसेल मी
अनोळखी वाटेवरी तुझ्यासवे असेन मी
जरी फितूर वागणे किनाऱ्याला
तरी कवेत घेतले मी वाऱ्याला

चाहूल हि आहे नवी
तू साद दे, ओ साथी रे
स्वप्नातल्या ह्या प्रेमास रे
तू नाव दे, ओ साथी रे

सांगायचे जे राहिले बोलू जरा नजरेतुनी
बरसेल रे आभाळ ते, जे दाटले होते मनी
जरी क्षणात बंध वाहुनी गेला
तरी फिरून चांद येई भेटीला

चाहूल हि आहे नवी
तू साद दे, ओ साथी रे
स्वप्नातल्या ह्या प्रेमास रे
तू नाव दे, ओ साथी रे



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Mahesh, Chinar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link