Lovestory

गार गार थिएटरात इंटरवल झाला
तिथेच आपल्या स्टोरीचा पहिला सीन आला
Popcorn च्या गर्दीत झाली अशी धडक
डोळ्यांमधून काळजात घुसली तडक
हसून मला म्हणाली Would you like a bite?
मनात म्हणालो वेडे हे तर
हे तर love at first sight

माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी पॉम पॉम पॉम

हे शिवनेरीच्या Stop वर दुपारचं ऊन
त्यात ती दिसली अन गेलो गारठून
आली माझ्या नशिबात तिच्या शेजारचीच सीट
अचानक ओळखल्याची मी acting केली नीट
अरे तू!

ला ला ला ला
खांद्यावर डोकं आलं
मन झालं मोरपीस
मनातल्या मनात दिला
हळूच पहिला किस
फूड मॉल आला तेव्हा
उठून हसली स्वीट
म्हणाली माझ्यासाठी
कॉफी आणतोस प्लीज
थँक्यू म्हणत प्रेमानं धरला माझा हात
एक सेल्फी घेतला
वाटलं झाली सुरुवात

माझी स्टोरी
स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी
हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी पॉम पॉम पॉम
मग या कहाणीत एक ट्विस्ट आला
उतरल्यावर एक भुरट्या पर्स घेऊन पळाला
हू आता मी झालो बच्चन केला पाठलाग
सोडवली पर्स अन अडकलो काळजात
त्या काळजाचा स्क्रीन खाली पडून फुटला
जेव्हा तिचा बॉयफ्रेंड मला आपणहून भेटला
त्याच्या बायसेप एवढी होती माझी कम्बर
मनात केलं मी ब्लॉक पण शेअर केला नंबर

मग transition
सुदैवाने बॉयफ्रेंड निघाला possessive
ती म्हणे तो aggressive
पण आपण खेळत राहिलो defensive
Possessive, aggressive, defensive

हळूहळू शेअरिंग झालं (ओह्ह हो हो)
शेअरिंग चं केअरिंग झालं (आह्ह हा हा)
केअरिंग चं डेअरिंग झालं (ओ ओ ओ...)
आणि मग डेअरिंग चं
आणि मग डेअरिंग चं

मला वाटलं आता होईल खरी सुरुवात
तेवढ्यात तिला ऑफर आली मोठी परदेशात
विचारलंही नाही तिनं घेतला decision
मग मीही म्हटलं नको व्हायला आपण दुसरा option

ती गेली निघून
कायमची ताटातूट
Sad song violins सगळं एकसाथ
दाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत
अनेक दिवस आठवणीत पिक्चर पाहिले जाऊन
पॉपकॉर्न च्या काउंटरपाशी पाहील उभं राहून

मग चौदा फेब्रुवारी!
हॅपी बड्डे माझा!
Exactly बारा वाजता
Message आला तिचा
राहवत नाही सतत विचार तुझा
तुझ्याविना वेळ जात नाही माझा
तुझं हसणं हवंय तुझं रुसणं हवंय
तू नसलास तरी एकमेकांचं असणं हवंय

नुस्ता text वाचूनही डोळ्यातून पाणी आलं
मग international callsचं मोठं बिल आलं
अरे गाढवांनो इथे झाली complete आमची story
ट्विस्ट वाली turn वाली लव स्टोरी
ह्यांची स्टोरी कित्ती भारी हिट वाली लव स्टोरी
हो माझी love story
हो आमची love story...



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link