Ranga Maliyela

रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
सौभाग्याची मंगलघटिका
सौभाग्याची मंगलघटिका आली आली गं
हळदी ल्याली, बाहुली माझी मोठी झाली गं
सजणाची स्वारी थांबली गं दारी
सात जन्मासाठी बांधली गं दोरी
सात जन्मासाठी बांधली गं दोरी
आज मनमनी तनमणी हरखला गं
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला सावळ्याचा शेला
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे

कोवळी माती, सोवळे नाते
कोवळी माती, सोवळे नाते
संसारचे फिरते जाते
क्षणी विहरते, क्षणात अडते
अदमासाने पाऊल पडते
रीतभात हे सांगते
आ, रीतभात हे सांगते
प्रीत दूरच्या अंगणी नांदते गं
हात धरियेला, हात धरिलीयेला
भरतार केला सरस्वती चा चेला
माथी घाली गं पुस्तक पाठी
माथी घाली गं पुस्तक पाठी

हो, चांदण गोंदण आले भाळी
हो, अल्लड भोळी नवीन भाळी
हो, दिस मासाची वर्षे झाली
केशर न्हाली मेहंदी ओली
दिस मासाची वर्षे झाली
केशर न्हाली मेहंदी ओली
अंग अंग हे बहरले
हो, अंग अंग हे बहरले
आज दर्पणी ही कुणी वेगळी गं
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे



Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Hrishikesh Saurabh Jasraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link