Gondal Majhe Mauli

हे जग किर्रर काळी रात
जप डोळ्यातली वात
ए, झुंजुमुंजु होत आलं जी
झुंजुमुंजु होत आलं जी

उजाडेल-उजाडेल जरा धीर धर, बये
लोळण घेतिल सूर्याची किरण तुझ्या पायावर गं
(उजाडेल-उजाडेल जरा धीर धर, बये)
(लोळण घेतिल सूर्याची किरण तुझ्या पायावर गं)

पुढच्या वळणावर पहाट तुझी बघतिया वाट
कर उंबऱ्याला पार, मागं पडो धरदार माझी माय गं
आता पावलाना चढू दे गं चालण्याचा ज्वर
उजाडेल-उजाडेल जरा धीर धर गं

माझे माय माऊली, माझे माय माऊली
माझे माय माऊली, माझे माय माऊली
माझे माय माऊली, माझे माय माऊली

तुला खुणावतो आहे आता तुझा पैलतीर
तुला कसली भीती? रीती न भाती तुझ्या लेखी गैर
(तुला कसली भीती? रीती भाती तुझ्या लेखी गैर)

नको कोंधट गाभारा, नको धूपाचा उबारा
सोड आरतीनं माझा रमाला समाज तुझा तुच स्वर
(सोड आरतीनं माझा रमाला समाज तुझा तुच स्वर)

ये भवसागर लांगून, बये
ये भवसागर लांगून देवपणाचं वल्ल कर
गाठशिल पैलतीर जरा धीर धर गं

माझे माय माऊली, माझे माय माऊली
माझे माय माऊली, माझे माय माऊली
माझे माय माऊली, माझे माय माऊली

ए, झळाळेल चाहुलीनं उभं चराचर
बये, सोन्याला, रुपयाला, हिऱ्याला, मोत्याला नाही तुझी सर
(बये, सोन्याला, रुपयाला, हिऱ्याला, मोत्याला नाही तुझी सर)

असा बुद्धीचा शृंगार त्यात डोळ्यात अंगार
माझ्या बयेला बधून, बधती थांबून अवनी-अंबर
(माझ्या बयेला बधून, बधती थांबून अवनी-अंबर)

हे, तिन्ही लोकी झाला एका मुखाने गजर (एका मुखाने गजर)
तिन्ही लोकी झाला एका मुखाने गजर
आणि उघडलं-उघडलं गंजलेल दारं

माझे माय माऊली, माझे माय माऊली
माझे माय माऊली, माझे माय माऊली
माझे माय माऊली, माझे माय माऊली



Credits
Writer(s): Jashraj Joshi, Saurabh Bhalerao, Vaibhav Joshi, Hrishikesh Datar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link