Ninutva

निमूट ताऱ्याचं, भान वाऱ्याचं
नाव तुझं बदलीन गं
कुंकू भाळात, श्वास जाळात
गाव तुझं बदलीन गं

ये साजणी श्वासात गं
घे साजणी ध्यासात गं

चिमूट चाऱ्याचं, भान वाऱ्याचं
नाव तुझं गिरवीन रं
नथ नाकात, शालू झोकात
कुंकू तुझं मिरवीन रं

देव्हाऱ्यात माझ्या मूरत ही तुझी
पिरतीची पूजा अशी मांडीन गं
काळजात माझ्या पिरत ही तुझी
दिन-रात पूजा अशी मांडीन रं

ये साजणी गंधात गं
घे साजणा बंधात रं

निमूट ताऱ्याचं, भान वाऱ्याचं
नाव तुझं बदलीन गं
Hmm, नथ नाकात, शालू झोकात
कुंकू तुझं मिरवीन रं

गहिवरात यावं, दहिवरात गावं
पिरतीची साद तुला घालीन रं
अंगणात यावं अन चांदण हसावं
पुनवचा चांद तुझा दावीन गं

घे साजणा ध्यासात रं
ये साजणी श्वासात गं

चिमूट चाऱ्याचं, भान वाऱ्याचं
नाव तुझं गिरवीन रं
कुंकू भाळात, शालू झोकात
गाव तुझं बदलीन गं



Credits
Writer(s): Roshin Balu Kallan, Gourav Dasgupta, Shaan, Sanjay Krishna Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link