Deva Tujhya Gaabhaaryaalaa

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळनाचं काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना?
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी (ऐक एकदा तरी)
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

हे, आर-पार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले
का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले
स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आर पार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देवा तू
हे, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

का रे तडफड ही ह्या काळजा मधी?
घुसमट तुझी रे होते का कधी?
माणसाचा तू जन्म घे
डाव जो मांडला मोडू दे

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे?
का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे?
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले?
अंतरांचे अंतर कसे नं कळले

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आर-पार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आर पार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू



Credits
Writer(s): Amitraj, Sameer Saptiskar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link