Tujhe Geet Ganyasathi

रसिक हो, नमस्कार
रसिक हो, पाडगावकर म्हटले की
आपल्याला आठवतात त्यांची अनेक गाणे
पण या गाण्यांच्या बरोबरीने

अनेक कविता, भावगीत, गझल, बालगीत
वात्रटिका, बोलगाणी असे कवितेचे विविध प्रकार
यशस्वीपणे हाताळणाऱ्या मंगेश पाडगावकर यांच्या
कवितेची ही एक छोटीशी महफील
रसिक हो, खास तुमच्यासाठी

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या-निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा

या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा-दिडदा वाजती सतारी

सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
शांत-शांत उत्तररात्री मंद-मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे

चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
एक-एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना

पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, Yashwant Deo
Lyrics powered by www.musixmatch.com

Link