Khali Doka Var Pay

जेव्हा तिला वाटत असतं तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ तुम्ही जवळ घ्यावं
अशा क्षणी चष्मा पुसत तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला
व्यामिश्र अनुभुती शब्दांनी तोलत बसला

तर काय? तर काय? खाली डोकं, वर पाय
जेव्हा ती लाजत म्हणते, "आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून तिला घट्ट जवळ घ्यायचं
भिजल्यामुळे खोकला होणार की तुम्ही आधीच ताडलं

भिजणं टाळून खिशातून खोकल्याचं औषध काढलं
तर काय? तर काय? खाली डोकं, वर पाय
तिला असतो गुंफायचा याच क्षणी श्वासात श्वास
अनंततेवर काळाच्या तुमचा असतो दृढ विश्वास

तुम्ही म्हणता, "थांब जरा" आणि होता लांब जरा
तुम्ही चिंतन करीत म्हणता दोन श्वासामध्ये जे अंतर असतं
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं
तर काय? तर काय? खाली डोकं, वर पाय

भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडीत असता
व्याकरणाचे बारकावे त्याचे तुम्ही पंडित असता
ती ओठ जवळ आणते व्याकरणात तुम्ही शिरता
ओठ हे सर्वनाम त्याचा तुम्ही विचार करता
तर काय? तर काय? खाली डोकं, वर पाय



Credits
Writer(s): Pramod Nair
Lyrics powered by www.musixmatch.com

Link