Bai Majhi Karangali Modali

अरंरंरंरं, आरं मित्रा, हे तू बरं नाही केलस
आरं, पहिली बायको चांगली नोकरीला असताना
तिला सोडून तू दुसरी बायको का केलीस?
काय सांगू मित्रा तुला माझं दुःख

हे बघ, माझ्या पहिल्या बायकोची नौकरी होती
Telephone operator ची, बरोबर आहे
तर ती दिवसभर जे कामावर बोलायची
तेच रात्री झोपेत बडबडायची, असं!
म्हणायची, "hold down, hold down"

अरेच्या! मग काय झालं?
म्हणून मी तिला सोडून शाळेतल्या
टीचरशी लग्न केलं, आता मी लई समाधानी आहे
कारण, आताची ही माझी बायको

रात्री झोपेत बडबडते, "repeat please"
"repeat please, repeat please"

आरं, त्या दिवशी तिनं कहरच केला, वयं
दिवसा ढवड्या बडबडाया लागली, असं
म्हणून मी तिची मस्करीत करंगळीच मोडली
तर म्हणते कशी, कशी? अशी

ऐन दुपारी यमुनातीरी...
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा?

जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा?

गुपचूप येऊन पाठीमागून
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी वेणी ओढली

बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
हा, बाई माझी करंगळी मोडली

समोर ठाके उभा आडवा हातच धरला...
अंगाला हात लावायचं काही कारण होतं का?
समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा

मी ही चिडले...
मी ही चिडले, हिरीस पडले...
मी ही चिडले, हिरीस पडले, वनमाला तोडली

बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
हा, बाई माझी करंगळी मोडली

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
हा, बाई माझी करंगळी मोडली



Credits
Writer(s): Kamlesh Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link