Chal Mazya Payat

अहो, शेतकरी दादा, काय?
मी मुंबईला चाललोय, असं
आणि मला गाडी पकडायला लय उशीर झालाय
तुमच्या शेतातून जाऊ का?

म्हणजे मला पाचची गाडी मिळेल ना
हाव जा की माझ्या शेतातून shortcut आहे
तुम्ही सरळ जावा पुढं
पुढं तुम्हाला माझा मारका बैल भेटंल
मग पाचचीच काय, चारची पण गाडी भेटंल

अरे बापरे! त्यापेक्षा मी इथंच राहतो की
अहो, ऱ्हा की इथं आपण तमाशाला जाऊया
तुमच्याकडं पाच रुपये आहेत का? हे काय
मग तुमचं पाच अन माझं पाच
आपण दोघं बी मिळूनशन बघूया सुंदराबाईचा नाच

चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावानी
चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावानी

काय तुझ्या मनात? सांग माझ्या कानात
काय तुझ्या मनात? सांग माझ्या कानात
गोड-गोड गुपित तुझ्या मनी रे
चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावानी

डौल आला खांद्याला, वाक आला बांध्याला
डौल आला खांद्याला, वाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफनी

रुसते मी मनात, हसते गालात
Hmm, रुसते मी मनात, हसते गालात
भुलते मी सुरात रातराणी रे
चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावानी

नाजूक ओठाखाली...
नाजूक ओठाखाली छोटीशी बाई करांगुली
नाजूक ओठाखाली छोटीशी बाई करांगुली

लाजते मनात, कशी सांगू जणात?
लाजते मनात, कशी सांगू जणात?
नांदू त हो कशी राजा-राणी रे?
चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावानी

रूप माझं चंद्राचं, पहा लाख मोलाचं
रूप माझं चंद्राचं, पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी ताराराणी

लुकलुकत्या ताऱ्यात डूलते तोऱ्यात
लुकलुकत्या ताऱ्यात डूलते तोऱ्यात
शोभते शुक्राची मी चांदणी रे
चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावानी



Credits
Writer(s): Kamlesh Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link