Ghar He Sundar

घर हे सुंदर, विद्यामंदिर उभी शारदा देवी

घर हे सुंदर, विद्यामंदिर उभी शारदा देवी
तुझी कृपा राहावी शारदे, तुझी कृपा राहावी
घर हे सुंदर, विद्यामंदिर उभी शारदा देवी

जय शारदे, जय शारदे, जय शारदे
जय शारदे, जय शारदे, जय शारदे

तू ज्ञानाची मंगलज्योति
दहा दिशा या उजळून जाती
तू ज्ञानाची मंगलज्योति
दहा दिशा या उजळून जाती

या तेजाने शक्ती, बुद्धी एकरूप व्हावी
तुझी कृपा राहावी शारदे, तुझी कृपा राहावी
घर हे सुंदर, विद्यामंदिर...

जय शारदे, जय शारदे, जय शारदे
जय शारदे, जय शारदे, जय शारदे

तुझीच माया, किमया सारी
मन हे घेई गगन भरारी
तुझीच माया, किमया सारी
मन हे घेई गगन भरारी

जशी पक्षिणी सामर्थ्याने उंच-उंच जावी
तुझी कृपा राहावी शारदे, तुझी कृपा राहावी
घर हे सुंदर, विद्यामंदिर...

जय शारदे, जय शारदे, जय शारदे
जय शारदे, जय शारदे, जय शारदे

सरस्वती तू, तूच शारदा
सुख-शांतीची देई संपदा
सरस्वती तू, तूच शारदा
सुख-शांतीची देई संपदा

तुझी प्रार्थना एकमुखाने सर्वांनी गावी
तुझी कृपा राहावी शारदे, तुझी कृपा राहावी
घर हे सुंदर, विद्यामंदिर...

जय शारदे, जय शारदे, जय शारदे
जय शारदे, जय शारदे, जय शारदे
जय शारदे, जय शारदे, जय शारदे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Bal Palsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link