Pratibimb Tuzhe Panyat Pahuni Hasale

प्रतिबिंब तुझे पाण्यात पाहुनी हसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
प्रतिबिंब तुझे पाण्यात पाहुनी हसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
प्रतिबिंब तुझे, प्रतिबिंब तुझे

कळ्या-फुले ही झाडे-वेली
हळूच तयांनी कुजबुज केली
लाज बावरी होता-होता
कळी खुदकली गोऱ्या गाली

कळ्या-फुले ही झाडे-वेली
हळूच तयांनी कुजबुज केली
लाज बावरी होता-होता
कळी खुदकली गोऱ्या गाली

का मदनपाखरू फांदीवरती बसले?
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
प्रतिबिंब तुझे, प्रतिबिंब तुझे

अंग चोरूनी उभी अशी का?
मिलन क्षण हा होई बोलका
या स्पर्शाने उठे शहारा
जीव होऊ दे हलका-हलका

अंग चोरूनी उभी अशी का?
मिलन क्षण हा होई बोलका
या स्पर्शाने उठे शहारा
जीव होऊ दे हलका-हलका

या ओठांनी मी रंग गालिचे पुसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
प्रतिबिंब तुझे, प्रतिबिंब तुझे

हा प्रीतीचा मंचक सजला
धुंद सुगंधी मधात भिजला
श्वासामधुनी फुंकर येता
चंद्रदीप हा हलके विझला

हा प्रीतीचा मंचक सजला
धुंद सुगंधी मधात भिजला
श्वासामधुनी फुंकर येता
चंद्रदीप हा हलके विझला

जणू भेटीतून या स्वप्न उद्याचे ठसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
डोळ्यात वेगळे रंग प्रीतीचे दिसले
प्रतिबिंब तुझे, प्रतिबिंब तुझे, प्रतिबिंब तुझे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Bal Palsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link