Gau Gau Jaya Geet Gau Marathi Christian Song

गाऊ, गाऊ, जय गीत गाऊ
सर्व मिळूनी गाऊ
माझा येशु राजा जीवीत आहे
विजयाचे गीत गाऊ

पाप आणि श्राप दूर साराया
जगी तो अवतरला
दैवी कोपाग्णी अनुभवूनी पुन्हा
जिवंत जाहला

राजे-महाराजे सर्वच आहेत
निजले कबरेत
माझा येशु राजा जीवीत आहे
स्वर्गात उन्नत

आळस सोडू, आसवे पुसू
सावध होवू या
माझा येशु राजा येईल तेंव्हा
तैयार राहू या

प्रतापशाली राजासाठी
कमानी उंच करा
द्वारांनो तुम्ही उंच व्हा हो
येईल येशू राजा



Credits
Writer(s): Albert Sunil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link