Pailtiri Janarya Yatrekaru

पैलतिरी जाणाऱ्या यात्रेकरू
वादळ पाहून नको तु भिऊ
सागराला व लाटांना
नियंत्रण करणारा आहे प्रभु येशू

विश्वास -रुपी तुझ्या नौकेत
थकून जाशील तू वल्ही मारत
भिऊ नको प्रभु आहे सोबत
पोहोचविल स्वर्गीय बंदरात

माझे स्वदेश येथे नाही
येथे मी आहे परदेशवासी
स्वर्गीय नगर माझे पैलतीरी
प्रभु मजसाठी ते तैयार करि

कोकरा आहे दीप जेथे
अंधार नाही मुळीच तेथे
धारण करीन वस्त्र तलम तागाचे
देईल तो मुकुट मला जीवनाचे



Credits
Writer(s): Albert Sunil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link