Maza Prabhu Yeshu

माझा प्रभु-येशु माझा आश्रय
धन्य मी, धन्य मी
राहीन त्याठायी मी निर्भय
धन्य मी, धन्य मी

सर्वत्र जरी घोर अंधकार
प्रभुच मला नेईल पार
हात तो धरुनी नेई संभाळूनी
करितो प्रतिपाळ प्रतिदिनी, प्रतिदिनी

स्वदेह ज्याने केले अर्पण
जातो मी सर्वदा त्यास शरण
धावत जाईन, आश्रय घेईन
तोच माझे आहे शरणस्थान, शरणस्थान

काल्व्हरी वरचा माझा प्रभु
राहिला नाही कबरेत तू
मृत्युला जिंकुनी, उठला त्या सुदिनी
राजांचा राजा तु सिंहासनी, सिंहासनी

अशी धन्यता या भूवरी
नाही सापडी निश्चित ही
अश्रूंच्या धारांना, नाही येथे अंत
प्रभुच्या ठायीच पूर्णानंद, पूर्णानंद



Credits
Writer(s): Albert Sunil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link