Vasant Rutu Aala - Subhadraharan

(वसंत ऋतू आला)
(आला वसंत ऋतू आला)

वसुंधरेला हसवायाला
सजवित-नटवित लावण्याला
आला, आला (वसंत ऋतू आला)
(आला वसंत ऋतू आला)

शतरंगांची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण

चैतन्याच्या गुंफित माला
रसिकराज पातला

आला, आला (वसंत ऋतू आला)
(आला वसंत ऋतू आला)

वृक्षलतांचे देह बहरले
फुला-फुलातून अमृत भरले
वृक्षलतांचे देह बहरले
फुला-फुलातून अमृत भरले

वना-वनातून गाऊ लागल्या
पंचमात कोकिळा

आला, आला (वसंत ऋतू आला)
(आला वसंत ऋतू आला)

व्याकुळ विरही युव-युवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
व्याकुळ विरही युव-युवतींना
मधुर काल हा प्रेममिलना

मदनसखा हा शिकवी रसिका
शृंगाराची कला

आला, आला (वसंत ऋतू आला)
(आला वसंत ऋतू आला)
आला वसंत ऋतू आला (आला)
वसंत ऋतू आला (आला)

वसंत, वसंत, वसंत आला
(वसंत, वसंत, वसंत आला)
(वसंत ऋतू आला)
(आला वसंत ऋतू आला)



Credits
Writer(s): Vasant Desai, Vasant Pawar, Prabhu Vasant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link