Soneri Unhaat

सोनेरी उन्हात (सोनेरी उन्हात)
हिरव्या रानात (हिरव्या रानात)

सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल
सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

हवेत हलतो, झुलतो, डुलतो
सरीसरींचा हा रुपेरी महाल
सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

पिसाट पाऊस, सुसाट पाऊस
पिसाट पाऊस, सुसाट पाऊस
डोंगर-दरीत त्याचा दरारा (त्याचा दरारा)
कडकपारी भिजून, थिजून
झेलून वादळी त्याचा फवारा (त्याचा फवारा)

इथून, तिथून, कळेना कोठुन
वेगाने येई तो करीत चाल
इथून, तिथून, कळेना कोठुन
वेगाने येई तो करीत चाल

हवेत हलतो, झुलतो, डुलतो
सरीसरींचा हा रुपेरी महाल
सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

विराट पाऊस, अफाट पाऊस
विराट पाऊस, अफाट पाऊस

विराट पाऊस, अफाट पाऊस
निवांत नदीला करी बेभान (करी बेभान)
भोवरा करून वाऱ्याला पळवी
उरात भरून त्याच्या उधाण (त्याच्या उधाण)

उदार होवून ज्याला जे हवे ते
त्याला ते पाऊस करी बहाल
उदार होवून ज्याला जे हवे ते
त्याला ते पाऊस करी बहाल

हवेत हलतो, झुलतो, डुलतो
सरीसरींचा हा रुपेरी महाल
सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

हवेत हलतो, झुलतो, डुलतो
सरीसरींचा हा रुपेरी महाल
सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

सोनेरी उन्हात, हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल



Credits
Writer(s): Yuvraaj, Kishor Rokalwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link