Kashyala Lavato

धडाचं नाही तुमचं बियानं
त्यानंच लावलिया वाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट.
पेरतोस मिरची कोल्हापुरची ची
अन उसाची धरतोस आशा
रिकाम्या हिरीला लावतोस ईंजान
हायब्रीड तुझा तमाशा
नुस्याच करतोस बाराच्या वार्ता
हिशेब पावने आठ.
लई कसाची जमीन माझी तिला
कश्शाला लावतोस नाट.
खुळं पाखरू तुझ्या जीवाचं
झुरतय कोनापाई
कशाला ठेवतंय चोच रिकामी
दान्याला म्हंतय नाही
सुगीच सांगतेय लूटून जाया
शिवार बिनबोभाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट.



Credits
Writer(s): Guru Thakur, Amitraj Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link