Dev Kopla

एकलाच व्हतो किर्र काळोख भी व्हता
नझरला वाट घावना
थकलेल्या पाठीवर दुःखाचा पिटारा
नियतीनं डाव मांडला
कुणीच न्हाई संग जीव माझा कोंडला
जिंदगी ही राख झालीया
तुझा रं आधार दारी तुझ्या आलोया
कुणी दार उघडना का देवा सांग ना?
काळजाला घाव सोसना, का रं बा
आज माझा देव कोपला
काळजाला घाव सोसना, का रं बा
आज माझा देव कोपला

आसवाना आला पुर देव झाला हा कठोर
झालं समशान का उरी
सुखाच्या सागरात दाटलया वावटल
लावली दीठ ही कुणी
कसं मी भरू रं फाटक्या या झोळीला?
समदं मिळालं मातीला
दगडाच्या देवा दिली पदरात निराशा
फुटल पाझर सांग कधी रं तुला?
काळजाला घाव सोसना, का रं बा
आज माझा देव कोपला
काळजाला घाव सोसना, का रं बा
आज माझा देव कोपला

शिवबा रं राजा रं

तळपत्यो आगीवाणी रयतेचा माझा राजा
सुर्व्याच तेज फिक जी
इघ्न जरी आसमानी धिट होऊनी त्यो लढला
असा माझा शिवबा मल्हारी
अरं नग आता थांबू गड्या मावळा तू हायेस रं
हो तयार लढण्याला भितो काऊन मर्दा रं
जिकण्याचं बल देतो शिवबा रं
करतो मानाचा मुजरा राजा रं
जिकण्याचं बल देतो शिवबा रं
करतो मानाचा मुजरा राजा रं



Credits
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link