Raangda Naach

हे दणक्यात साजरा करूया जागर
अंगात आग रं
मस्तीच गोफण खाणं ना झोपणं
चढलया तुफानं
अंगामंदी

हे अंगात भरलं वारं सनसनाट सनसनार
जोरदार मैफिलीला गाव आलं सारं
नाचू नाचू दुखुदे गड्या पायाची टाच
अरं बाबो
नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच

हे धिंगाणा घाला रे गोंधळ आणि राडा रे
तालावर धनधनाधन नाचून वाचून सोडा रे

हे सोडूनिया दुनियेची चिंता तुम्ही रं
एक संग व्हा ना
रात भर झोपण्याचा ईशय नको रं
निस्ता दंगा घाला
समदे सारे
गावाच्या वेशीला अंगाच्या पेशीला
नाद तुझा धनधनाधन समजू दे रं
रांगडा या मातीच्या रांगड्या या मर्दाचा
नाद आसमंताला उमजू दे रं
हे अंगात भरलं वारं सनसनाट सनसनार
जोरदार मैफिलीला गाव आलं सारं
हे नाचू नाचू दुखुदे गड्या पायाची टाच

हे इस्तवाचा रंग आता अंगात ओतूनी
बेधुंद रातीला या आलो आम्ही
समदे हायत राजी खुशी
जमलेया येशिपाशी होऊदे मरजीन
सारं काही

हे अंगात भरलं वारं सनसनाट सनसनार
जोरदार मैफिलीला गाव आलं सारं
नाचू नाचू दुखुदे गड्या पायाची टाच
नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच

पार पप्प रपप्पाप परपरप्परपप्पप
पार पप्प रपप्पाप परपरप्परा
पार पप्प रपप्पाप परपरप्परपप्पप

नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच



Credits
Writer(s): Joy Mehta, Shyamal Munshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link