Alyad Palyad (Title Track)

घात पात शब्दांचा कोण याच्या मागेवर
आर पार सुटलया काळावरच्या वाटेवर
घोर घोर रंगरुप हे काळोखाच्या बिंबावर
चित्र उमटले सामोरी हे

वाळून गेली झाडे झुडपे काळोखाचा मार
डोंगर आडवा भीतीचा ह्यो सोसायेना फार
गुपीत जणू बनलया हे मनाचं घुबाड
चित्र उमटले सामोरी हे
अल्याड पल्याड

तंत्र मंत्र मांत्रीकविद्या बेफालतू बेकार
भूतभनाती गावला या भयानक आजार
वेशिवरती गावकरी झालेया बेजार
भूत बघून घाबरले हे

कोरड पडली घश्याला या तहानलेला वार
घाबरलो या भूत्तांना र देवा तू सांभाळ
खेळ चाले प्रेतांचा हा भलता लपंडाव
चित्र उमटले सामोरी हे
अल्याड पल्याड

अमावसेच्या राती करणी धरणी झाली
अमावसेच्या राती करणी धरणी झाली
गाव वाली बिच्चारी भूतांची ही न्याहारी
भूतांची ही न्याहारी भूतांची ही न्याहारी

लिंबू मिरची पिळून गेली मांत्रिक भूर्टी निघाली
हट्ट मातला भूतांचा हा भोंदू साधू निकामी
धांदल अशी उडाली की कोण येतंय माघारी
चित्र उमटले सामोरी हे

वाळून गेली झाडे झुडपे काळोखाचा मार
काठ आडवा नदीचा ह्यो करणार कसा पार
गुपीत जणू बनलया हे मनाचं घुबाड
चित्र उमटले सामोरी हे
अल्याड पल्याड



Credits
Writer(s): Nayum Pathan, Amit Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link