Dhund Hi Hawa (From "Aalya Julun Tara")

धुंद ही हवा, मंद गारवा
धुंद ही हवा, मंद गारवा
आज तू मला हवास, माझिया जीवा
माझिया जीवा
धुंद ही हवा
धुंद ही हवा
धुंद ही हवा

जळ निळेनिळे, माळ जांभळे
जळ निळेनिळे, माळ जांभळे
केशरी नभात चंद्र आज पारवा
आज पारवा

धुंद ही हवा, मंद गारवा
आज तू मला हवास, माझिया जीवा
माझिया जीवा
धुंद ही हवा

झनन झांजरा, पवन बावरा
झनन झांजरा, पवन बावरा
दरवळून राहिला सूरात मारवा
सूरात मारवा

धुंद ही हवा, मंद गारवा
आज तू मला हवास, माझिया जीवा
माझिया जीवा
धुंद ही हवा

लवतं अंबर, झुलतं झुंबर
लवतं अंबर, झुलतं झुंबर
बांध प्रीतीच्या नभात आज चांदवा
बांध प्रीतीच्या नभात आज चांदवा

धुंद ही हवा, मंद गारवा
धुंद ही हवा, मंद गारवा
आज तू मला हवास, माझिया जीवा
माझिया जीवा
धुंद ही हवा

ला-ल-ला-ल-ला
ला-ल-ला-ल-ला



Credits
Writer(s): Suhasini Inlekar, Rahul Ghorpade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link